HW News Marathi
व्हिडीओ

कर्नाटक सरकारकडून १५% मराठा आरक्षणाची घोषणा,महाराष्ट्र मात्र न्यायालयीन कचाट्यात

मोठी बातमी. कर्नाटकमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकात मराठा समाजाला १५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी विधानसभेत केली आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षणात १५ टक्के आरक्षण मराठा समाजाला कर्नाटकमध्ये मिळणार आहे. एकीकडे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेला असताना दुसरीकडे शेजारच्या कर्नाटकात ही घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकात सध्या मराठा समाजाचा समावेश हा ३ बी प्रवर्गात आहेत. या ३ बी प्रवर्गातून आता मराठा समाजाचा समावेश २ ए प्रवर्गात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जे फक्त ५ टक्के आरक्षण होते ते आता वाढवून १५ टक्के करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. #MarathaReservation #Maharashtra #Karnataka #Maratha #UddhavThackeray #AshokChavan #BSYediyurappa #SupremeCourt #SambhajirajeChhatrapati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane विरूद्ध Shivsena दुसरा अंक सुरू होणार ? कोकणातील ‘ती’फाईल उघडणार?

News Desk

नवशक्ति : पुरुषांची मक्तेदारी मोडून तीने जपली लोककला

News Desk

NCP Mumbai | जयंत पाटील ठरवणार राष्ट्रवादी मुंबईचा नवा अध्यक्ष !

swarit