HW News Marathi
महाराष्ट्र

ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर होणार का ?

सांगली| महाराष्ट्रात अनेक गावात अतिशय भीषण दुष्काळ असल्याने दुष्काळ प्रतिबंधासाठी केंद्र सरकारची वाट न बघता राज्य सरकारने दुष्काळाच्या प्रतिबंधसाठी उपायोजना करावी. तसेच सध्या बहुतेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत असल्याने ३१ ऑक्टोबरनंतर १७२ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जत येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हि माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात हजार गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण झाली आहेत,मात्र जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. ज्या तालुक्यात ३१ टक्क्यापेक्षा जास्त दुष्काळ असल्यास सवलती जाहीर कराव्यात. तसेच प्रशासकीय इमारत, नवीन बसस्थानक, म्हैसाळचे पाणी, विभाजन या तालुक्याच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात अशी मागणी खा. संजय पाटील यांनी केली आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर लाईट बिल, पाणी पट्टी, जनावरांचा चारा, शालेय फी, टँकर या सवलती राज्यसरकार समोर मांडण्यात आल्या आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कंगना देशभक्त ठरत असेल तर Y कशाला तिला Z सुरक्षा द्या – विजय वडेट्टीवार

News Desk

आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

swarit

राज्य सरकारला दुष्काळाच्या माहितीसाठी अजून किती वेळ हवा? , न्यायालयाचे ताशेरे

News Desk
देश / विदेश

आता परदेशातही माल्ल्याच्या अडचणीत वाढ

Gauri Tilekar

नवी दिल्ली | भारतीय बँकांना तब्बल ९ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याला लवकरच परदेशातही बेघर होण्याची वेळ आली आहे. विजय माल्ल्याचा लंडनमधील रेजेंट पार्क येथील बंगला जप्त करण्यासाठी स्विस बँक यूबीएस एजीने उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. परदेशातही कर्जाची परतफेड न केल्याने विजय माल्ल्यासह सिद्धार्थ माल्ल्यावरही हा खटला दाखल करण्यात आला आहे.

विजय माल्ल्याने मार्च २०१२ मध्ये आपला हा अलिशान बंगला ‘रोज कॅपिटल वेंचर्स लिमिटेड’साठी तारण ठेऊन बँकेकडून २.०४ कोटी पाउंड म्हणजेच १९५ कोटी कर्ज घेतले होते. माल्ल्याने दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने विजय मल्ल्याच्या कुटुंबियांना बंगला रिकामी करण्यास सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी बंगला रिकामी करण्यास नकार दिला आहे, असे यूबीएसने म्हटले आहे.

विजय माल्ल्याला फरार घोषित करण्यासाठी ईडीने ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातर्गंत’ अर्ज केला होता. त्यावेळी मल्ल्याने फरार घोषित करण्यासाठी ईडीने केलेल्या याचिकेला विरोध दर्शविला होता. भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी मी ब्रिटनमधील प्रशासनाला व्यवस्थित सहकार्य करत असल्याचे माल्ल्याने म्हटले होते.

Related posts

इस्लामविरोधी ट्वीटमुळे गमावावी लागली नोकरी

News Desk

सुरेश प्रभू यांचा राजीनामा

News Desk

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna