HW News Marathi
देश / विदेश

विजय माल्ल्याचा ईडीवर धक्कादायक आरोप

मुंबई | भारतीय बँकांचे तब्बल ९००० हजार कोटी रुपये थकवून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याने आज अंमलबजावणी संचालनालयावर (ईडी) एक धक्कादायक आरोप केला आहे. ‘गेल्या दोन ते तीन वर्षापासून मी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करीत आहे मात्र मी ज्या ज्या वेळी असे प्रयत्न केले; त्या त्या वेळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मला सहकार्य न करता विरोधच केला, असे माल्ल्याने आपल्या जवाबात म्हटले आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) न्यायालयात सुनावणीवर आपला जवाब नोंदवला आहे. ईडीने ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातर्गंत’ विजय माल्ल्याला फरार घोषित करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणीवेळी माल्ल्याने आपली बाजू मांडली आहे. तसेच फरार घोषित करण्यासाठी ईडीने केलेल्या याचिकेलाही त्याने विरोध दर्शविला आहे. भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी मी ब्रिटनमधील प्रशासनाला व्यवस्थित सहकार्य करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

काहीच दिवसांपूर्वी माल्ल्याने लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना “परदेशात जाण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती” असे म्हटले होते. दरम्यान अरुण जेटली यांनी हे अमान्य केले होते. त्याचप्रमाणे आमची भेट ही अधिकृत नव्हती असेही त्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमित शहांच्या ‘त्या’ दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना भावनिक पत्र

News Desk

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि मोदींचे निकटवर्तीय केशुभाई पटेल यांचे निधन

News Desk

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जामीन मंजूर

News Desk
राजकारण

छिंदमच्या विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल

News Desk

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून संपूर्ण राज्याचा रोष ओढवून घेणाऱ्या श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ९ मधून २००० पेक्षा जास्त मतांसह विजयी झाला. परंतु, याबाबत आता आक्षेप घेण्यात आला आहे. छिंदमच्या विजयालाच आव्हान देणारी याचिका निलेश म्हसे यांनी याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. निलेश म्हसे हे या निवडणुकीत छिंदमच्या विरोधात उभे राहिले होते. छिंदमची झालेली निवड रद्द ठरवावी, अशी मागणी देखील या याचिकेमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेमुळे छिंदमच्या अडचणीत वाढ होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत छिंदमने अपशब्द काढल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर संतप्त टीका झाली होती. त्यामुळेच छिंदमला भाजपमधून बाहेरची वाट दाखविण्यात आली होती. त्यानंतर त्याने अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली. धक्कादायक म्हणजे छिंदमवर यावेळी गुन्हा दाखल असून तो तडीपार होता तरीही, या निवडणुकीत जनमत छिंदमच्याच बाजूनेच झुकले. मात्र, आता छिंदमच्या विजयला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आल्याने छिंदमच्या अडचणीत वाढ झाली आहे. महापलिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

Related posts

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

Aprna

गंभीरने मुख्यमंत्री केजरीवालांसह ३ जणांवर ठोकला मानहानीचा दावा

News Desk

मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?

News Desk