HW News Marathi
Covid-19

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१० एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्याच्या लॉकडाऊनसंबंधातसंदर्भात या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक सुरु असून यात सर्व विरोधी पक्ष उपस्थित आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच्या या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे महत्त्वाचे नेते सहभागी आहेत. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंगमध्ये सहभागी झालेले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांना सध्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज यांच्या हाताच्या शस्त्रक्रियेसाठी हे लीलावती रुग्णालयात दाखल असल्याने आजच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ते सहभागी होऊ शकलेले नाहीत. मात्र, काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह कोरोनाशीच संबंधित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच एक चर्चा झाली आहे. यावेळी राज ठाकरेंनी अनेक सूचना केल्या होत्या. या चर्चेबाबत राज यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन माहितीही दिली होती.

कळत नकळत होणारा प्रसार घातक – मुख्यमंत्री

राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात आणावी लागेल. रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसेच, लोकांचं येणं जाणं थांबलं पाहिजे, कार्यालयाच्या वेळा बदलल्या पाहिजे. घरातूनच कामाचं नियोजन झालं पाहिजे. पीक अवर ही संकल्पनाही बदलली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असं मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनसाठी होकार देण्याचं आवाहनच सर्व पक्षांना केलं आहे.

कोरोनाचा कळत नकळत होणारा प्रसार अत्यंत घातक आहे. तरुण वर्ग कोरोनामुळे अधिक बाधित होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे २५ वयापासूनच्या पुढील तरुणांना लस देण्याची परवानगी देण्याची पंतप्रधानांकडे मागणी करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तरुणांना, लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत असल्याने सगळ्यांना लस देणे गरजेचे आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या ४७ हॉटेलवर पुण्यात कारवाई!

News Desk

एकीकडे ५ राज्यांचा निवडणुकीचा निकाल लागला अन् दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले

News Desk

कोरोनाची लस ‘या’ देशात चाचणीसाठी झाली तयार

News Desk