HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याची १३ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

मुंबई | राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता सक्तवसुली संचालनायलाने (ईडी) जप्त केले आहे. ईडीकडून जप्त केलेली मालमत्तेची किंमत १३ कोटी ४१ लाख एवढी आहे. तसेच ईडीने तनपुरेंच्या दोन जमिनी देखील जप्त केल्या आहेत. यात नागपूरमधील ९० एकर जमीन आणि अहमदनगरमधील ४ एकर जमिनीचा समावेश असून या जमिनीची किंमत ७ कोटी ६० लाख एवढी आहे. आता केंद्र सरकारची तपास यंत्रणेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्या मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता प्राजक्त तनपुरे हे रडारवर आहेत. 

दरम्यान, तनपुरेंनी राज्य सरकारी बँकेने कर्जामुळे बुडीत गेलेला राम गणेश गडकरी साखर कारखान्याचा लिलाव केला होता. या लिलावात साखर कारखाना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत तनपुरेंच्या प्रसाद शुगर अँड अलाईड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सला विकल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने चौकशी करत त्यांच्या कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ईडीच्या दिल्ली आणि मुंबईच्या पथकांनी मुंबई, पुणे, नागपूर आणि अहमदनगरसह नऊ ठिकाणी त्यांनी छापे मारले होते. तेव्हा ईडीला राम गणेश गडकरी साखर कारखान्याच्या लिलावाबद्दल माहिती मिळाली आहे. 

कोण आहेत प्राजक्त तनपुरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत. तनपुरे हे महाविकासआघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्यमंत्री आहेत. तनपुरे यांचे वडिल प्रसाद तनपुरे हे देखील खासदार आहेत. आणि प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप म्हणतं राष्ट्रवादीकडून पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न, तर आजित पवार म्हणाले….!

News Desk

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीवर राष्ट्रवादीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, अजित पवारांचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न

News Desk