HW News Marathi
महाराष्ट्र

ईडी पान-तंबाखूचं दुकान झालंय…भाजपविरोधात बोलल्याने उद्या माझ्याही घरी ईडी येऊ शकते

सोलापूर। सक्तवसुली संचनालय (ईडी) म्हणजे पान-तंबाखूचे दुकान झाले आहे. कोणाच्याही घरात घुसते आणि कोणालाही उचलून घेऊन जाते. जे त्यांच्या (भारतीय जनता पक्षाच्या) विरोधात बोलतात, ईडी त्यांच्या घरात घुसते. मी त्यांच्या विरोधात बोलतेय, त्यामुळे माझ्या घरातही उद्या ईडी येऊ शकते, अशी भीती काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.प्रणिती शिंदे सोलापुरात रविवारी एका खासगी कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी भारती जतना पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या तीनही पक्षांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. तसेच, राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून पडत असलेल्या छाप्याबाबतही भाष्य केले. भाजपच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर ही कारवाई होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

समझने वालोंको इशारा काफी है

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “भाजपमुळे देशातील सामाजिक वातावरण बिघडलं आहे. देशात सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भीतीमुळेच सर्वजण घरात बसले आहेत. आज मी यांच्या विरोधात बोलतेय तर माझ्या घरीही ईडीची धाड पडू शकते. ईडी म्हणजे पान-तंबाखूचं दुकान झालंय. कुणाच्याही घरात घुसतात आणि लोकांना उचलून नेतात. ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलं आहे ते लोक आता खुलेआम फिरताना दिसत आहेत. तर निर्दोषांना त्रास दिला जात आहे. समझने वालोंको इशारा काफी है.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काँग्रेसच्या काळात जे मनात येईल ते खाण्याच, कपडे घालण्याचं, जिथे पाहिजे तिथं फिरण्याचे स्वतंत्र होते. मात्र, सध्या परिस्थिती पूर्णतः उलट झाली आहे, अशी टीकाही प्रणिती शिंदे यांनी बोलताना केली. दरम्यान, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या बिनकामाच्या पार्टी आहेत. यांचे फक्त दोनच उद्देश आहेत, ‘आवो, झगडा लगाओ और चले जावो… बत्ती लगाओ और चले जावो…असंही त्या या वेळी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Covid-19 : महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर; आरोग्यमंत्र्यांचा इशारा

News Desk

सुशांत सिंह आत्महत्येच्या चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला मुंबई पालिकेने केले सक्तीचे क्वॉरंटाईन

News Desk

भाजपचे नेते पांडेंचा प्रचार करणार का? या आमच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते म्हणून… गृहमंत्र्यांनी पुन्हा फडणवीसांना डिवचले

News Desk