मुंबई | सध्या ईडीच्या रडार मधून कुणीच सुटत नाही आहे. नुकतीच लग्नबंधनात अडकलेली अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स पाठवल्यावर बॉलीवूडमध्ये अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यामी गौतम नंतर आता अभिनेता डिनो मोरियाला ईडीने समन्स पाठवला आहे. डीने डिनो मोरियाची कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. डिनो मोरियासोबतच कॉग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या संपत्तीवरही ईडीने कारवाई केली आहे. बँकेची फसवणूक आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केलीय.
Enforcement Directorate (ED) has provisionally attached movable & immovable properties worth Rs. 8.79 Crore under PMLA in Sandesara Group case. With this attachment, the total attachment reached to Rs 14,521.80 Crore: ED pic.twitter.com/tBylEB1rPI
— ANI (@ANI) July 2, 2021
अनेक कलाकारांना ईडीचा समन्स
एकूण ८.७९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडी जप्तीची कारवाई करणार आहे. यात अभिनेता संजय खानची ३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर डिनो मोरियाची १.४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात येत आहे. डीजे अकीलच्या १.९८ कोटी तर इरफान सिद्दीकी यांच्या २.४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.
यामी गौतम ला ईडीकडून समन्स
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ईडीकडून समन्स जारी करण्यात आलंय. ईडीने यामी गौतमला चौकशीसाठी बोलावलं आहे. यामीने FEMA संबंधित उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यामीला या प्रकरणी हा दुसरा समन्स पाठवण्यात आला असून. मुंबईत ईडीच्या झोन-२ मध्ये तिची चौकशी होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.