HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीचे समन्स!

मुंबई। शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ४ ऑक्टोबरला भावना गवळी यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला ईडीने मंगळवारी अटक केली आहे. गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये बदल करुन कंपनीत रुपांतर केल्याप्रकरणी संचालक सईद खानला ईडीने अटक केली आहे.

दरम्यान, सईदच्या अटकेनंतर ईडीने भावना गवळी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. ईडीने याआधी भावना गवळी यांच्या संबंधित असणाऱ्या ९ ठिकाणांवर ईडीने छापेमारी केल्यानंतर, परभणी येथील पाथरी याठिकाणी ईडीने मंगळवारी मोठी कारवाई केली. ईडीच्या कारवायांमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती

भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी तपास करत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशनकडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डाने ४३.३५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.

याशिवाय, भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून ७.५ कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला ७.९ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात अनेक वर्ष राजकारण केलं, भाजपचा गंभीर आरोप

News Desk

राज्यात सत्त स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल | सुधीर मुनगंटीवार

News Desk

गुढी पाडव्याच्या निमित्ताने मराठी हिंदू दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk