HW News Marathi
देश / विदेश

संजय राऊत-आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा ! भाजप नेत्याची सीबीआयकडे मागणी

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण आता ढवळून निघाले आहे. या प्रकरणी, शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ या सदरातून काही दावे केले होते. मात्र, सुशांतच्या कुटुंबीयांनी संजय राऊतांचे हे सर्व दावे खोडून काढले आहेत. त्यातच आता, “शिवसेनेचे लोक सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला चांगलेच घाबरलेले आहेत. जर संजय राऊतांना, शिवसेनेच्या लोकांना इतकीच माहिती आहे तर मग या प्रकरणी सीबीआयने संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा”, अशी मागणी भाजप नेते आणि बिहार भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केली आहे.

“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांना, संजय राऊतांना जर सगळेच माहिती असेल तर मग सीबीआयने संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, जेणेकरून सगळेच रहस्य उलगडेल. एक गोष्ट स्पष्ट आहे कि, मुंबई पोलिसांच्या काही खास लोकांना, महाराष्ट्र सरकारच्या काही खास लोकांना तसेच सुशांतशी संबंधित विशिष्ट लोकांना सुशांतसिंह प्रकरणाविषयी सर्व माहिती आहे. मात्र, मुंबई पोलीस सत्य लपवण्याचा आणि पुराव्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असाही गंभीर आरोप यावेळी बिहार भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन !

News Desk

अटलजींनी नेहरूंचा हटवलेला फोटो पुन्हा लावायला सांगितला…. आज अटलजींची जयंती !

News Desk

नागरिकत्व विधेयकाविरोधात शहांवर निर्बंध लादण्याची अमेरिकन आयोगाची मागणी

News Desk