HW News Marathi
महाराष्ट्र

राणेंच्या जुहू बंगल्यातून महापालिकेचे तपासणी पथक निघाले, कठोर कारवाई होणार?

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू बंगल्यावर ‘अधीश’ महापालिकेचे नऊ अधिकारी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. राणेंच्या बंगल्यावर जाण्यापूर्वीच पालिकेचे अधिकाही हे सांताक्रुज पोलीस स्टेशनवर पोहचले होते. तर दुसऱ्याबाजुला राणेंच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पालिका अधिकारी हे त्यांच्या पद्धतीने काम करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटल्या. आता पालिकेचे पथक नऊ जणांचे पथक निघाले आहे. आता पालिका राणेंच्या बंगल्यावर आज (२१ फेब्रुवारी) कारवाई करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

दरम्यान, राणेंना त्यांच्या बंगल्याचे ले-आऊट स्वत:सोबत ठेवण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांनी दिली असून त्यांच्या घरी के-वेस्ट वॉर्ड अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे आठ जणांचे पथक पाहाणी करण्यासाठी पोहचले आहे. राणेंनी एफएसआय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्या बंगल्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्याची पाहाणी केली होती. माहिती अधिकारी कार्यकर्त्याने राणेंचा बंगला अनधिकृत असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहाणी करून कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती मिळाली होती. 

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीवर आरोप केले होते. यानंतर राणेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर अधिकाऱ्यांवर टीका केली होती. त्यावेळी राणेंनी मातोश्रीच्या चौघांना ईडीची नोटीस बजावली जाणार आहे, असे जाहीर केले होते. यानंतर राणेंना त्यांच्या बंगल्याला नोटीस पाठवण्यात आली. परंतु, मातोश्री – २ बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचा सवाल राणेंनी पत्रकार परिषदेतून केला होता.   

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे २५ हून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात | गिरीश महाजन

News Desk

आईला बाजारात पाठवून घेतला गळफास

News Desk

राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर

News Desk