HW News Marathi
महाराष्ट्र

“गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले..” , खडसे -महाजन वाद सुरू

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात व्हायरल ऑडियो क्लीपवरुन आता नवा सुरु झाला आहेे वाद आता जास्त रंगण्याची शक्यता आहे. कारण महाजन यांनी खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्य केल्यानंतर खडसे यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीश भाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकता”, असं खडसे म्हणाले आहेत. तसेच गिरीश महाजन यांचा आपल्याला सर्व इतिहास माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलं, असं मोठं विधान खडसे यांनी केलं आहे.

एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजन यांना इशारा

“मी जे ऑडिओ रेकॉर्डमध्ये बोललो आहे, जामनेर मतदारसंघातून मला नागरिकांचे फोन येत आहेत. तालुक्‍यात पाणीटंचाईची समस्या आहे. कोरोनाच्या काळात दिवसेंदिवस तिथे रुग्णांचे अक्षरक्ष: मुर्दे पडत आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या तालुक्यात आहेत. गिरीश महाजन तिकडे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. तालुक्यातील नागरिक माझ्याकडे संताप व्यक्त करत आहेत. 1994, 1995 मध्ये फरदापूर येथे गिरीश महाजन यांची काय घटना घडली होती ती मला आणि जनतेलाही माहिती आहे. त्यांचा पूर्ण इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही”, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.

गिरीश महाजनांच्या वक्तव्याला काय दिले प्रत्युत्तर?

“मुख्यमंत्रीपदाचे स्वप्ने पाहणे काय गैर आहे? गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणले. त्यांच्या राजकारणात आर्थिक मदत मी दिली. त्यांच्या प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो. म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत. मी कोणाची हाजीहाजी करत नाही. मी कोणाचे पाय चाटत नाही. त्यामुळे गिरीश भाऊ तुम्ही माझी काळजी करण्याची गरज नाही. पहिले आपल्या मतदारसंघात पाहा”, असं सडेतोड प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

एकनाथ खडसे यांच्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, असे वक्तव्य केले. या ऑडिओ कल्पीमध्ये खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या क्लीपवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्य केलं.

गिरीश महाजन काय म्हणाले?

“मी खडसे यांना दोष देणार नाही. वाढतं वय, एवढे आजार आणि त्यामध्ये जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता त्याला बिचाऱ्याला आमदारकीपण मिळत नाहीय. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं. लोकांना आणि सगळ्यांना कोण काय आणि कोण काय नाही ते माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत”, असं म्हणत महाजन यांनी खिल्ली उडवली.

एकनाथ खडसे फोनवर काय म्हणाले?

जामनेरच्या वाकोदजवळ असलेल्या वडगाव बुद्रूक गावातील एका गावकऱ्याने एकनाथ खडसे यांना फोन केला होता. त्याने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर एकनाथ खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का , असे म्हटले होते.

त्यावर गावकऱ्याने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे यांनी, तो (गिरीश महाजन) फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदे यांचा फोटो समोर ठेवत अघोरी जादू टोण्याचा प्रकार, दोन जण अटकेत

News Desk

“रश्मीताई, राऊतांसारख्या तालिबानी प्रवृत्तीच्या मुसक्या तुम्ही कधी आवळणार?”, भाजपचा शिवसेनेला सवाल

News Desk

गोपीचंद पडळकर सुसाट ; पवारांनंतर आत्ता ठाकरेंना आव्हान

News Desk