मुंबई | भाजपला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याचे म्हटले जात आहे. ईडीने ३० डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितल्याची चर्चा आहे. याबाबत ईडीकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटींचा घोटाळा उघड करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा काल (२५ डिसेंबर) दिवसभर रंगली होती.
ईडीने एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपची ही हुकूमशाही सुरु आहे. ईडीची नोटीस ही सूडबुद्धीने देण्यात आली आहे. मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठवली होती. आता खडसेंना पाठवली आहे. खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप मिटकरींनी केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.