HW News Marathi
महाराष्ट्र

‘एकनाथ खडसेंनी सीडी पोलिसांकडे दिली’, योग्य वेळी दाखवणार असल्याचं स्पष्टिकरण!

जळगाव। ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ हे वाक्य संपुर्ण महाराष्ट्राला परिचित आहे, याच वक्तव्यावर आज एकनाथ खडसे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. आपण पोलिसांकडे सीडी दिली असून योग्य वेळी दाखवणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ईडी लावली तर सीडी लावेन असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले.गेल्या 40 वर्षात माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आला. कोर्टानेही आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे.

चंद्रकांतदादांचा आभारी आहे

जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी. त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभेत मी वारंवार विचारलं माझा दोष काय आहे ते सांगा. आता ईडीने चौकशी लावली. ती कोर्टात काय व्हायचं ते होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

भाजप- सेना युतीवर नितेश राणेंचं थेट भाष्य! म्हणाले…

News Desk

भाजपचा माईक काढला,अभिरूप अधिवेशन गुंडाळले !

News Desk