HW News Marathi
महाराष्ट्र

ईडी कार्यालयात चौकशीला का जाणार नाही याचे खडसेंकडून स्पष्टीकरण!

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आज (३० डिसेंबर) ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, खडसेंना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने ते चौकशीला जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर आता पत्र लिहित स्वत: एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहणार होतोच. मात्र, २८ डिसेंबरच्या मध्यरात्री ताप, सर्दी, कोरडा खोकला असा सौम्य त्रास जाणवू लागला.

वैद्यकीय चाचणी केल्यानंतर कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगितले. त्यानंतर कोरोना चाचणी केली आहे. रिपोर्ट अद्याप आले नाहीत. त्यामुळे १४ दिवस विश्रांती आवश्यक असल्याने १४ दिवसांनतर ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात ईडीला कळवले आहे. आणि संमती देखील मिळाली आहे. प्रकृती बरी झाल्यानंतर ईडीला पूर्ण सहकार्य करेन, असे पत्र एकनाथ खडसे यांनी लिहिले आहे. दरम्यान, भोसरी भूखंड प्रकरणी ही नोटीस आहे. याआधीही चार वेळा चौकशी झाली आहे, ही पाचवी आहे. मी यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही. आज मला काहीही सांगायचं नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिरीष कुलकर्णी यांनी पोलिसांना शरण यावे | मुंबई हायकोर्ट

News Desk

भाजप आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

Aprna

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

Aprna