HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार यांनी रयतच्या कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले सुपूर्द

मुंबई | साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार आज संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जमा केलेल्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.

कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता.

या सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये २ कोटी ७५ लाख ९२ हजार ८२१ रुपये इतकी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपूर्द केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी राणा दाम्पत्यांचे सर्व प्रकार सुरू, बच्चू कडूंची टीका

Aprna

रश्मी ठाकरेंचे वडिल माधवराव पाटणकरांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

सारथी जिवंत ठेवण्याबाबत महाविकास आघाडी व शरद पवारांची जबाबदारी – छत्रपती संभाजी राजे यांचे प्रतिपादन

News Desk