HW News Marathi
महाराष्ट्र

मला ईडीची अद्याप कोणतीही नोटीस आली नाही, खडसेंचं स्पष्टीकरण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असे त्यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडी’ने ३० डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ईडी’ला एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध नक्की कोणते पुरावे मिळाले आहेत, याविषयी चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ खडसे यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांनी आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळून मी भाजप सोडत असल्याचे ते म्हणाले होते. माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता ईडीची नोटीस आल्यावर खडसेंनी म्हटल्याप्रमाणे ते सीडी लावणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय पोलिस जगातील सर्वोत्कृष्ट;त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान-अजित पवार

News Desk

दीपिका, श्रद्धा पाठोपाठ सारा अली खानही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर

News Desk

“चुकीला माफी नाही”, पडळकरांच्या हल्ल्यावर अजित पवारांचं भाष्य!

News Desk