HW News Marathi
महाराष्ट्र

दीपिका, श्रद्धा पाठोपाठ सारा अली खानही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर

मुंबई | बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण अभिनेत्री रिया चर्कवर्तीमूळे समोर आले. आणि एक एक करत अभिनेत्रींची नावे समोर येण्यास सुरुवात झाली. दरम्यान, मुंबईच्या एनसीबी कार्यालयात अभिनेत्री सारा अली खान दाखल झाली आहे. तिची आज चौकशी होणार आहे. तसेच, या आधी आज (२६ सप्टेंबर) अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी सुरु आहे. आज दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी करणार असल्याचं दिसून येत आहे.

 

दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली. यात जवळपास चार तास रकुलची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची चौकशी होणार आहे.त्यामूळे बॉलिवूडमधील हे ड्रग्स प्रकरण कोणते वळण घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ? करूणा शर्मा यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

News Desk

मनसेने कोविड सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकरांनी फेटाळला

News Desk

“मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’”, नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्ला

News Desk