HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

मुंबई। राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने दणका दिला असून खडसेंची मातमत्ता ईडीने जप्त केली आहे. तब्बल ५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त करण्यात आहे आहे. भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीने गेल्या महिन्यात तब्बल ९ तास चौकशी केली होती. पुण्यातील भोसरी MIDC भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती.

७३ लाखांची संपत्ती जप्त केली

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं. मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांना एका निवेदनाद्वारे १४ दिवसांची वेळ मागितली होती. दरम्यान, ईडीने आता खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची संपत्ती जप्त केली आहे. अजूनही काही मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता आहे.

तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यलायतून एकनाथ खडसे बाहेर

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यलायतून एकनाथ खडसे बाहेर पडले आहेत. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र त्या उपस्थित राहिला नाहीत.

एकंदरीत प्रकरण काय आहे?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७५ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मी मुख्यमंत्र्यांचे नागपूर घेईन !

News Desk

“कोरोना म्हणतोय मी पुन्हा येईन…”, पुन्हा येईन, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला    

News Desk

जगाला गुड बाय करण्याची वेळ आली, सचिन वाझेंच्या धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने उडाली खळबळ

News Desk