जळगाव | अमळनेरहून जळगावच्या दिशेने जात असताना राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात आज (१ नोव्हेंबर) झाल्याची माहिती मिळत आहे. खडसेंच्या गाडीचे कारचे टायर फुटून हा अपघात झाला. दरम्यान, सुदैवाने या अपघातात खडसेंसह सर्वच जण सुखरुप असून कोणालाही ईजा झालेली नाही. एकनाथ खडसेंनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी नाराज एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राजीनामा देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 1, 2020
एकनाथ खडसे याबद्दल केलेल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, “आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.” दरम्यान आज दिवसभर खडसे आणि गृहमंत्री अनिल देशमुखांसह नंदुरबारमधील शहादा येथे एकत्र होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.