HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

बोरखडा अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांसह खडसेही घेणार पीडित कुटुंबाची भेट

जळगाव । राज्याचे अनिल देशमुख हे जळगाव विमानतळावर दाखल झाले असून ते आज (१७ ऑक्टोबर) बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाची भेट घेणार आहेत. त्याप्रमाणे, जळगांव विमानतळाहून रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे पिडीत कुटुंबाच्या भेटीसाठी गृहमंत्री थोड्याच वेळापूर्वी रवाना झाले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील अनिल देशमुख यांच्यासह पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत. या संदर्भात विचारपूस केली असता, या घटनेची लवकर चौकशी व्हावी या संदर्भांत मी गृहमंत्र्यांना भेटायला जात असल्याचे खडसे यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यावेळी म्हणाले की, “बोरखेडा रावेर येथे जे हत्याकांड घडले ते खूप निंदनीय आहे. लहान मुलांची हत्या आणि १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे देखील समजते आहे. या अत्याचारात आदिवासी कुटुंब भरडले गेले. या संदर्भात मी गृहमंत्री यांच्याशी भेट घेऊन आग्रह करणार आहे की याबाबत चौकशी करून आरोपींना लवकर शिक्षा झाली पाहिजे.”

“राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अनिल देशमुख यांच्याशी काही चर्चा होईल का?” या पत्रकारांच्या प्रश्नावर मात्र खडसेंनी यावेळी मौन पाळत उत्तर देण्याचे टाळले. खरंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात होता. मात्र, पुन्हा एकदा खडसेंनी यु-टर्न घेतल्याचे चित्र आहे.

Related posts

सार्वजनिक, घरगुती कार्यक्रमात शीतपेयऐवजी दूध द्या | नितीन गडकरी

News Desk

मोदी सरकारने काम करावे, बोलणे व डोलणे कमी करावे !

News Desk

आपल्याच लोकांना राज्यात घ्यायला त्यांचा विरोध आहे, मजुरांचे दु:ख विचारणार्‍यांचा द्वेष | सामना

News Desk