मुंबई | संपूर्ण महाराष्ट्रात आज एकच विषय सुरु होता तो म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का? दरम्यान, यावर आता खडसेंनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.ज्या विषयातील मलाच माहिती नाही, आणि ज्यांनी हा विषय काढला त्यांना अधिक माहिती असेल त्यांच्याशी चर्चा करा. आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झाले याचे उत्तर मी कसे देणार, अशी प्रतिक्रिया भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
आज (२३ सप्टेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसची जळगांवमध्ये बैठक झाली. यावेळी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का या विषयावर चर्चा झाल्याच माहिती मिळत होती. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आजच्या बैठकीत खडसेंवर चर्चा झाली नाही तर जळगांव जलसिंचनावर चर्चा झाल्याने स्पष्ट केले. आणि प्रवेश करणार का तर या जर तरला काही महत्व नसते, असे म्हणत त्यांनी या चर्चेचा पुर्णविराम दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.