HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंना आम्ही वाळीत टाकले नाही, रावसाहेब दानवेंचे खडसेंच्या पक्षांतरावर उत्तर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादीत खडसे प्रवेश करणार असेही वृत्त सोशल मीडियात झळकत होते. त्यातच आता एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र एकनाथ खडसे भाजपा सोडून कुठेही जाणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना दानव म्हणाले की, एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपा वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच त्यांच्यासोबत मी सतत बोलत असतो. मी त्यांच्या संपर्कात आहे. ते भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत. पक्षामध्ये एखाद्याला संधी मिळते, तर असते एखाद्याला मिळत नाही. मात्र एकनाथ खडसे यांना नक्की संधी मिळेल, त्यांना काही आम्ही वाळीत टाकलेलं नाही, असे स्पष्टीकरण देताना रावसाहेब दानवे यांनी एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम देणअयाचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधील – अजित पवार

News Desk

“काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते”, रावसाहेब दानवेंचा हल्ला

News Desk

इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार! – नाना पटोले

News Desk