HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांना आम्ही नोटीस पाठवली नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण!

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याचे वृत्त सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते आणि चर्चेचा विषयही ठरला होता. दरम्यान, काल (२२ सप्टेंबर) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत या वृत्ताला शरद पवारांनी दुजोरा देखील दिला होता. पत्रकारांनी त्यांना खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनाही नोटीस बजावल्याचा प्रश्न विचारला असता मलाही आयकर विभागाची नोटीस आली आहे, असे शरद पवार म्हणाले होते.

मात्र, आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण आले आहे. निवडणूक आयोगाकडूनच अत्यंच महत्त्वाची माहिती देत पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचं स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुनच आयकर विभागानं शरद पवार यांच्या नावे नोटीस पाठवली होती. शरद पवारांकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं यात म्हटलं गेल्याची माहिती समोर आली.

‘सुप्रियालाही काल संध्याकाळी नोटीस येणार होती. मात्र, पहिली नोटीस मलाच आली, हे चांगले झाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाने ही नोटीस पाठवल्याचे मला समजले. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंदच’, अशी खोचक टिप्पणी पवारांनी काल (२२ सप्टेंबर) केली होती. पण, आता मात्र निवडणूक आयोगानंच अशी नोटीस पाठवल्याचे वृत्त नाकारल्यामुळं यासंबंधीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. यावर आता काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा महापारेषणमुळे तासाभरात पूर्ववत

Aprna

नारायण राणेंच्या अटकेचा आदेश काढणारे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे राज ठाकरेंच्या भेटीला!

News Desk

राज्यातल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची महत्त्वपूर्ण माहिती…!

News Desk