HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक मतदान सुरु, राष्ट्रवादी की भाजप कोण बाजी मारणार?

पंढरपूर | गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निवडणूकीची जय्यत तयारी, सभा सुरू होत्या तो दिवस आज (१७ एप्रिल) आला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू झाले आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे हे मतदान १२ तासांचे असणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच काल ईव्हीएम मशिनसह इतर आवश्यक सर्व साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले होते. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पण जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान हे १२ तास केले जाणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित अथवा चुकीचा प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील असणाऱ्या १६ मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी स्थानिक पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असा अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रिंगणात कोणाची नावे

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह १८९ उमेदवार रिंगणात आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना पुन्हा धक्का!; ईडी कोठडीत ३ दिवसांची वाढ

News Desk

अनाथ बालकांसाठी 5 लाखाची मदत, जिल्यातील एकही बालक वंचित राहणार नाही – यशोमती ठाकूर

News Desk

ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये – चंद्रकांत पाटील  

News Desk