HW News Marathi
Covid-19

विधानपरिषदेची निवड बिनविरोधी, तर भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

मुंबई | देशात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लांबणीवर केलेल्या विधानपरिषदेची निवडणुकीला आता केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. येत्या २१ मे रोजी मुंबईत विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणूक घेत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरनाबाबतच्या इतर सगळी काळजी घेणे बंधनकारक सांगितले आहे. मात्र, यानंतर बुहर्चिचत विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोधी होणार का? आणि भाजप चौथा उमेदवार देणार का?, याकडे आता सर्वांचे लक्ष लागेल आहे.

विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, आणि शिवसेना १ अशा एकूण ९ जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणू जिंकून येण्यासाठी २९ मते आवश्यक आहेत. तर महाविकास आघाडीला विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. महाविकासआघाडीने विश्वदर्शक ठरावा वेळी १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. मात्र, भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे एकून ११२ सदस्यांचा पाठिंबा आहेत.

शिवसेनेच्या कालावधी संपलेल्या आमदाराच्या जागी मुख्यमंत्री उद्धव ठकरे हे उमेदवार आहेत. तर विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे याही निवृत्त होण्यामध्ये यांचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांचे निवडून येणे आवश्यक वाटते. शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी २ मतांची कमतरता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे तीन सदस्य निवृत्त झाले. तर विधानसभेत निवडून आलेल्या ५४ व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते सहज जिंकून येतील. तर काँग्रेस ४४ सदस्या असून त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

दरम्यान, भाजपकडे १०५ जागा असून अपक्षांचा पाठिंब्याने त्यांचे संख्याबळ ११४वर आहे. यात भाजपचे तीन सदस्य निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपला चौथा सदस्य निवडणून आणण्यासाठी काही मते कमी पडत आहे. तसेच भाजपच्या चौथ्या जागेवर नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये विधानपरिषदेच्या उमेदवारी रस्सीखेच

भाजपचे तीन उमेदवार हे संख्याबळावर सहजरित्या जिंकून येतील. मात्र चौथ्या जागेसाठी भाजपला काही मते कमी पडत आहेत. मात्र, भाजपमध्ये जागेसाठी रस्सीखेच सुरू झालेली दिसून येत आहे. भाजपकडून विधानसभेचे तिकीड न मिळालेले आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे, नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आणि विधानसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे या नेत्यांची विधानपरिषदेवर चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे भाजप प्रावक्ते भाधव भांडारी, कोकणातून विनय नातू, प्रमोद जठार, भाजपमध्ये नुकतेच आलेले विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजिंतसिंग मोहिते पाटील आणि कराडचे अतुल भोसले यांच्या देखील नाववर चर्चा होत आहे.

भाजपकडून पंकजा मुंडे विधानपरिषदेवर ?

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकमध्ये बांधकाम व्यवासायिक सुरू करण्याचा निर्णय तातडीने श्रमिक रेल्वे केल्या रद्द

News Desk

“आजोबांनी IPL मध्ये चिअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो”, राणेंची जहरी टीका

News Desk

विजयादशमीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करू, धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा !

News Desk