HW News Marathi
महाराष्ट्र

इंधन दरवाढीनंतर आता वीज महागणार

मुंबई | पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने सध्या सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्यावर असा इंधन दरवाढीचा प्रचंड भार असताना आता ‘राज्य वीज नियामक आयोगा’ने राज्यातील जनतेला आणखी एक मोठा दणका दिला आहे. महावितरणची वीज महागल्याने आता राज्यातील जनतेवर आणखी जास्त भार पडणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने देशातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. आता राज्यात वीजदेखील महागल्याने सामान्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. राज्यात शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या विजेचा दर सध्या ३.३५ रुपये प्रती युनिट इतका आहे. त्यात वाढ होऊन तो आता ३.५५ रुपये इतका करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे घरगुती वापरासाठीच्या विजेचे दरही वाढवण्यात आले असल्याची माहिती एमईआरसीचे प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी दिली.

घरगुती वापरसाठीच्या विजेचा दर १०० युनिटपर्यंत ५.०७ रुपये प्रती युनिट आणि १०१ ते ३०० युनिटपर्यंतचा दर ८.७४ रुपये प्रती युनिट होता. जो आता अनुक्रमे ५.३१ रुपये प्रती युनिट आणि ८.९५ रुपये प्रति युनिट होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन !

News Desk

“…आता तरी मला वाटत नाही”, शरद पवारांची उद्धव ठाकरेंच्या भाकितावर प्रतिक्रिया

Aprna

स्वत: मुख्यमंत्री विरोधी पक्षातील आमदारांना फोन करतात !

News Desk
देश / विदेश

निरुपम म्हणतात, मोदी अशिक्षित

swarit

मुंबई | राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोदींवर आधारित “चलो जीते हैं” हा लघुपट दाखविण्यावरुन महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावरुन मोदींवर निशाणा साधला. “शाळा आणि कॉलेजमधील मुलांना राजकारणापासून लांब ठेवले पाहिजे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना अशिक्षित व्यक्तींच्या जीवनावर आधारित सिनेमा पाहून काय शिकायला मिळणार आहे,” असे वादग्रस्त विधान निरुपम यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “चलो जीते हैं” हा लघुपट राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्हाप्रमुख आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षकांना यासंबंधीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आमच्याकडून अशा सूचना दिल्या नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

“चलो जीते है” हा लघुपट ३२ मिनिटांचा असून मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केला आहे. हा लघुपट १८ सप्टेंबरला elearning.parthinfotech.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये हा लघुपट दाखवण्याच्या सूचना देण्यात आला आहे. यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, सर्व शाळांनी या लघुपटासाठी प्रक्षेपणासाटी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटरची सोय करायला शाळांना सांगितले आहे.

Related posts

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दाता दरबार दर्ग्याच्या बाहेर स्फोट, १८ हून अधिक जण जखमी

News Desk

राष्ट्रगीताचा अनादर केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना मुंबई न्यायालयाचे समन्स

News Desk

२० एप्रिलपासून राज्यातील ठराविक भागांत एसटी-बेस्ट वाहतूक सुरु होणार

Gauri Tilekar