HW News Marathi
महाराष्ट्र

“गुडघे टेकणार नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक”, ED च्या कारवाईनंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई | ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने ईडी अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीने राऊत आणि त्यांच्या मंत्रिपरिवारची जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊतांवर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. “मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला ना, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे,” अशी प्रतिक्रिया ईडीच्या कारवाईनंतर दिली आहे. ईडीने राऊतांच्या संपत्तीवर कारवाई केल्यानंतर त्यांनी ट्वीट केले आहे. राऊतांनी ट्वीटमध्ये म्हटले, “असत्यमेव जयते” असे सूचक विधान केले आहे. 

राऊत म्हणाले, “आता संपत्तीची व्यख्या बदलावी लागेल. माझे राहते घर फार तर २ रुम किंचन असेल. दादरसारख्या भागात मध्यवर्गीय मराठी माणसाचे घर आहे. अलीगाब हे माझे गाव आहे. ते २००९ पासूनची अलिबागमध्ये ५० एक गुंठ्याची जमीन आहे. याला जर कोणी संपत्ती मानत असेल तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे. तुम्ही आता ज्या घरात राहता त्या घरावर देखील कारवाई झाली का?, असा सवाल पत्रकारांनी राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “होऊ द्या, अशा कारवाईने संजय राऊत किंवा शिवसेना ही झूकणार नाही आणि वाकणार नाही. माझ्या दिल्लीच्या घरात काही महिन्यापूर्वी भाजपच्या लोकांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाही तर तुम्हाला खूप संकटांना सामोरे जावे लागेल. तेव्हा मी म्हटले की, मला ते शक्य नाही. तुम्हाला हवे ते तयार करा. ईडी कारवाई करणार यासंदर्भात तुम्हाला काही नोटीस आली होती का?, राऊत म्हणाले, ईडी माझ्यावर कारवाई करेल अशी नोटीस मला पाठवलेली नाही. मला शरद पवारांशी देखील फोन आला, त्यांनी चिंता व्यक्त केली आहे, राज्यातील नेत्यांशी बोलणे झाले का?, या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. जे घडते ते चांगल्यासाठी घरते, हे महाराष्ट्रातील जनतेला कळले की महाराष्ट्र आणि मराठी लोकांच्या बाबतीत. 

राऊतांवर झालेल्या कारवाईनंतर भाजपचे आमदार किरीय सोमय्यांनी पत्रकार परिषदे घेतली, यावर राऊत म्हणाले, “जो माणूस मराठीच्या मुद्द्यांवर कोर्टात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का?, कोण आहे तो. त्यावर प्रश्न विचारू नका. भविष्यात तुमचेही नंबर येणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली कश्या काम करत आहात, हे तुम्ही पहात आहात. संपत्ती जर रहते घर आणि एखाद्या कष्टाने जर घेतलेली संपत्तीचा संबंध कुठे तरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा.मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला ना तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार विरोधी आंदोलनाचा राजू शेट्टीना मोठा फटका!

News Desk

कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!

News Desk

निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर

swarit