HW News Marathi
महाराष्ट्र

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर “मराठी भाषा गौरव दिन” होणार साजरा

मुंबई | गेली चार वर्षे एसटी महामंडळाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी उद्या (२४ फेब्रुवारी) “मराठी भाषा गौरव दिन” मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही एसटीच्या सर्व ५६८ बसस्थानकावर ७० लाख प्रवाशांच्या साक्षीने एसटी कर्मचारी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करून मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर करणार असल्याची माहिती परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे.

एसटीच्या प्रत्येक बस स्थानकावर सकाळी ११ वाजता स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ पत्रकार आणि मराठीचे प्राध्यापक यांच्या हस्ते एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीत कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे अभिवादन केले जाणार आहे. ज्ञानोबा-तुकोबांची माय-माउली असलेली आपली मराठी भाषा, त्यांच्या अभंग आणि ओव्यांनी अधिक समृद्ध झाली आहे.

महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, कवी, नाटककार, कलावंत, प्राध्यापक, पत्रकार, यांनी आपला सिद्ध हस्त लेखणी व वाणीतून या माय मराठीला सातासमुद्रापार नेले आहे. प्रत्येक बस स्थानकावर स्वच्छता राखून सडा-रांगोळी, फुले, तोरण बांधून, आकर्षक कमानी सजवून सर्व प्रवाशी व कर्मचारी बांधवांना “मराठी भाषा गौरव दिनाच्या” शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हा वार्षिक योजनेतून किमान पाच टक्के निधी देण्यास मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये अधिक सुविधा देणे शक्य होईल! – वर्षा गायकवाड

Aprna

भाजपचं ‘मिशन बारामती’ यशस्वी होणार? का भडकल्या निर्मला सीतारामन

Manasi Devkar

“बीडमध्ये माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय?” – पंकजा मुंडे

Aprna