HW News Marathi
महाराष्ट्र

प्रत्येक निवडणुकीला चिन्ह बदलतच विजय मिळवत आलो आहे !

मुंबई | अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांनी २८ ऑगस्ट रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधले. “यंदाची निवडणूक ही मी लढवत असलेली आठवी निवडणूक आहे. मी आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीला चिन्ह बदलतच विजय मिळवत आलो आहे. मी चिन्ह बदलल्याशिवाय निवडूनच येत नाही”, असे मिश्किल विधान दिलीप सोपल यांनी केले आहे. दिलीप सोपल हे सोलापूर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

“माझा राजकीय वारसदार हा सोपल कुटुंबातीलच असेल असे नाही. तो एखादा सामान्य कार्यकर्ताही असू शकतो”, असे विधान देखील दिलीप सोपल यांनी यावेळी केले. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखले जातात. त्यामुळे दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मात्र मोठा धक्का मानला जात आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरु होती. मात्र, २६ ऑगस्ट रोजी दिलीप सोपल यांनी स्वतः अधिकृतपणे आपल्या शिवसेना प्रवेशाची घोषणा केली होती. सोपल यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर

swarit

कल्याण पूर्वेकडील स्कायवॉकचे काम पूर्ण

News Desk

मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार !

swarit