HW Marathi
महाराष्ट्र

राज्यातील तापमानात कमालीची वाढ, अमरावतीत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद

मुंबई । राज्यातील थंडी आता पळाली आहे. तिची जागा आता कडक उन्हाच्या झळांनी घेतली आहे. राज्यात सोमवारपासून (२५ मार्च) उष्ण वारे वाहू लागले असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी देखील तापमान चढेच राहिले आहे. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ४० अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले होते. तर मंगळवारी (२६ मार्च) मुंबईचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले आहे. शहरातील उकाडा अचानक वाढल्याने मुंबईकर बेहाल झाले आहेत. मंगळवारी अमरावतीत ४२.६ अंश सेल्सियस म्हणजेच राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईसह मुंबईच्या जवळपासच्या परिसरात बुधवारी (२७ मार्च) आणि गुरुवारी (२८ मार्च) आकाश निरभ्र राहणार आहे. या दिवसांत मुंबईतील कमाल तापमान ३८ अंश सेल्सियस तर किमान तापमान २४ अंश सेल्सियसच्या जवळपास असेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Related posts

अंबाबाई… कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे – अजित पवार

News Desk

नवजात शिशुला अज्ञात इसमाने फेकले नाल्यात

News Desk

तरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न 

News Desk