HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने सायनचा गड राखला, पोटनिवडणुकीत रामदास कांबळे विजयी

मुंबई | मुंबई महापालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक १७३च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे यांचा विजय झाला आहे. या प्रभागाचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आल्या होत्या. ही निवडणूक शुक्रवारी ६ एप्रिल रोजी पार पडली होती.

शनिवारी या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार उभे केले नाही तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रामदास कांबळे यांना ६६१६ मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे सुनील शेट्ये यांना ५७७१ मते मिळाले आहेत. शिवसेनेचे रामदास कांबळे यांनी काँग्रेसचे सुनील शेट्ये यांच्यात जोरदार टक्कर देत ८४५ मतांनी विजयी मिळवला होता.

अपक्ष उमेदवार गौतम झेंडे यांना ५४९ मतांनी पराभव झाला आहे. प्रभाग १७३च्या पोटनिवडणुकीत लोकांनी २३४ नोटा टाकल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

फडणवीसांच्या कार्यकाळातील फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा !

News Desk

फडणवीस एकही बॉल सीमेपार टोलवू शकले नाहीत, मुश्रीफांचा टोला

News Desk