HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ शपथविधीचा खुलासा करण्यापासुन अजित पवारांना फडणवीसांनी थांबवल….

मुंबई | देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथेवरुन आज विधानसभेत काही काळ तणाव आणि टोलोबाजीचं वातावरण पाहायला मिळालं.मराठा समाजाच्या मुलांच्या आंदोलनाबाबत यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते , ते म्हणाले, “मराठा समाजाचे लोक आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या प्रश्नातून काही मार्ग निघत नाही. काही मुलांची सेवा सामावून घ्यावी अशी मागणी आहे. अजित पवार ऑन द स्पॉट निर्णय घेतात. जसा त्यांनी रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथविधी झाला”

चंद्रकांत दादांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांना मराठा समाजाच्या मुलांच्या आंदोलनाबाबत आपण बैठक घेऊन तो विषय निकालात काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले.
मग अजित पवारांनी चंद्रकांतदादांनी दिलेल्या शपथेच्या दाखल्यावर भाष्य केलं. “चंद्रकांतदादा तुम्ही म्हणाला रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथ…. असं म्हणत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी मध्येच हस्तक्षेप केला. देवेंद्र फडणवीस लगेच बोलले की तुम्ही (अजित पवार) त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही. मग अजित पवार म्हणाले ते (फडणवीस) बोलले म्हणून मी बोलत नाही.

अजित पवार काही बोलणार इतक्यात देवेंद्र फडणवीसांनी त्यांना थांबवलं,त्यामुळे अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पहाटे घेतलेल्या शपथविधीचं रहस्य उलगडलचं नाही. परंतु असं काय झालं होतं की ते सांगण्यापासुन देवेंद्र फडणवीस अजित पवारांना रोखत आहेत ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध !

News Desk

आम्ही बहिण-भाऊ आहेत, आमच्या नात्यात पक्ष आणि राजकारण येऊच शकत नाही –  पंकजा मुंडे

News Desk

बॉलिवूडला संपवण्याचा प्रयत्न केला तर… मुख्यमंत्र्यांचा इशारा

News Desk