HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकराविरोधात फडणवीस आज दिल्लीला जाणार! केंद्रीय गृहसचिवांना देणार पुरावे…

मुंबई | महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.राज्यात पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन त्यांनी आरोप केले आहेत. मुंबई पोलीस दलात बदल्यांचं रॅकेट उघडकीस आल्यानंतर त्याचे सगळे पुरावे गुप्तचर विभागानं सादर करुनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यावर अद्याप काहीच कारवाई केलेली नाही.त्यामुळे आता फोन टॅपिंगचे, इतर सर्व महत्वाचे पुरावे घेऊन फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीमध्ये ते केंद्रीय गृहसचिवांना भेटून या बाबत CBI चौकशीची मागणी करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परीषदेत गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पोलीस दलात सुरू असलेल्या कारभारावरुन गंभीर टिका केली आहे ,’पोलीस दलात बदल्यांचं खूप मोठं रॅकेट असून यात अनेक अधिकारी देखील सामील असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत अनेक सबळ पुरावे गोळा केले होते आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांसोबतच मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. पण त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई का केली नाही?”, असा प्रश्न उपस्थित

करत आता राज्य सरकार काही करत नसल्याने हे प्रकरण आपण केंद्रात घेऊन जाणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

पोलिस दलातील रॅकेटबाबत फडणवीस काय म्हणाले ?

“महाराष्ट्रात पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक बडे अधिकारी आणि काही राजकारण्यांचीही नावं आहेत. त्यामुळे या चौकशी अहवालातील तब्बल ६ जीबीचे कॉल रेकॉर्ड्स पुरावे म्हणून सादरही करण्यात आले होते. पण ते अतिशय संवेदनशील असल्यानं सार्वजनिक करणं योग्य होणार नाही. या संदर्भात मी आता केंद्रीय गृहसचिवांची भेटीची वेळ मागितली आहे आणि त्यानुसार आज दिल्लीत मी त्यांना भेटून हे सर्व पुरावे त्यांच्यासमोर सादर करणार आहे”, असं फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC परिक्षेबाबत मुख्यमंत्री स्वत: पत्रकार परिषद घेणार – विजय वडेट्टीवार

News Desk

“ST प्रकरणात योग्य तो निर्णय उच्च न्यायालय देईल!” | अनिल परब

News Desk

शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर, संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद

News Desk