HW News Marathi
व्हिडीओ

थकीत पगारामुळे ST कर्मचाऱ्याची आत्महत्या, तासाभरात पगार देण्याची सरकारची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्शवभूमीवर ” काळ जरी कठीण असला तरी, आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यानी उचलू नये ” असे भावनिक अवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले आहे. तसेच, गेले ३ महिने एसटीच्या सुमारे ९७ हजार अधिकारी / कर्मचाऱ्यांचे थकीत असलेल्या वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून जमा होईल, ज्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त अग्रीम (बिनव्याजी उचल) हवा असेल त्यांना तातडीने आग्रीम देण्याचा प्रयत्न केला जाईल. उर्वरित २ महिन्याच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, बाकी एक महिन्याचे वेतन देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे, अशी माहिती मंत्री परब यांनी दिली आहे.ते पुढे म्हणाले कि, टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतुक बंद होती . त्यामुळे याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुलावर पाणी सोडावे लागले. परंतु याकाळातील इतर खर्च , जसे कर्मचाऱ्यांचे वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. २० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरु झाली आहे. परंतु कोरोना महामारीच्या भीतीमुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचे टाळले आहे.

#UddhavThackeray #AnilParab #ST #BJP #MahaVikasAghadi #Mumbai #Maharashtra #Jalgaon #Covid_19

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांचा खर्च वाढला की अर्थव्यवस्थेला हातभार लागणार ! | Rahul Gandhi | Abhijit Banerjee

Gauri Tilekar

आम्हाला त्या चोरीच्या पैश्याची गरज नाही; Nitesh Rane यांचा Sanjay Raut यांच्यावार पलटवार

News Desk

#BJPMahaSankalpPatra | भाजप संकल्पपत्र जाहीर, येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार निर्माण करणार

Gauri Tilekar