मुंबई | “उद्धव ठाकरे अयोध्येत मंदिर बांधतील, आम्ही मशिद बांधू,” असे वादग्रस्त विधान समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींचा मुलगा फरहान आझमी यांनी केले आहे. फरहान आझमी पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील आणि आपण बाबरी मशीद बांधू,” असे ते म्हणाले.
Farhan Azmi, son of Samajwadi Party (SP) Maharashtra leader Abu Azmi: If being the Chief Minister, Uddhav Thackeray says he is going to Ayodhya on 7th March, I will also go with him. He will build lord Ram's Temple & we will build Babri Masjid. (27.01.20) pic.twitter.com/InTAJ37cOy
— ANI (@ANI) January 30, 2020
दरम्यान, फरहान आझमी ऐवढ्यावरच थांबले नाही तर ते पुढे म्हणाले की, “शिवसेनेच्या वाघाची छाप दिसत नाही, उद्धव ठाकरेंसोबत मी सुद्धा अयोध्येत जाणार, असल्याचेही ते यावेळी म्हणाले. हे सरकार ७-८ महिन्यापेक्षा जास्त चालणार नाही असून या सरकारवर आमचा भरवसा नाही, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्चला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.