HW News Marathi
महाराष्ट्र

सर्जा राजाच्या साक्षीने नवदाम्पत्याने केली आपल्या सहजीवनाची सुरुवात

अर्धापूर | आधुनिकीकरणाच्या काळात लग्नसमारंभात मोठे बदल झाले आहेत. त्या बदलांतही अनेक जण आपली परंपरा जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. असाच प्रयत्न अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील शेतकरी कुटुंबियांनी केला आहे. संपूर्ण वऱ्हाडी वधुला आणण्यासाठी चक्क बैलगाडीने गेले व लग्नानंतर त्याने आपल्या वधूला लग्नमंडपातून सजविलेल्या बैलगाडीतून आपल्या घरी नेले. या आगळ्यावेगळ्या विवाहाची अर्धापूर तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

नववधूला कोणी बुलेटवरून, कोणी ट्रॅक्टरवरून, तर अगदी हेलिकॉप्टरमधूनही लग्न मंडपातून आपल्या घरापर्यंत घेऊन गेल्याची उदाहरणे आहेत. परंतु, अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव शामराव बारसे यांच्या मुलगा सुशिल शंकरराव बारसे यांच्या विवाह सोहळा शिवकन्या माधवराव भालेराव काल (६ फेब्रुवारी) एमशटवाडी येथे आपली रूढी परंपरा जपत वधूला सजविलेल्या बैलगाडीतून सुमारे दहा कि.मी. चा प्रवास करत आपल्या घरी नेले.

वहऱ्हाडी ही बैलगाडीने आले होते, नवरदेव आणि नवरीला ही बैलगाडी नेच नेले. मात्र, बदलत्या आणि वेगवान युगात त्यात मोठा बदल झाला आहे. वधूची पाठवणी शक्यतो वाहनातून होवू लागली. अनेक जण लाडक्या वधूला आपल्या घरी नेण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना शोधून काढतात. मात्र, बारसे यांच्या कुटुंबीयांचा विवाह एमशेटवाडी येथील माधव भालेराव यांची कन्या शिवकन्या हिच्याबरोबर पार पडला. त्याने वधूला आपल्या घरी नेण्यासाठी आलिशान गाडीची निवड न करता आपले वडील शेतकरी असल्याचा अभिमान बाळगत बैलगाडीची निवड केली. सायंकाळी पाच वाजता सजविलेल्या बैलगाडीतून वधूला बैलगाडीत आलिशान खुर्चीत बसवून स्वतः बैलांचा कासरा हातात धरत सर्जा-राजाच्या साक्षीने एमशेटवाडी ते बारसगाव असा १० कि. मी. चा प्रवास केला. या वधूवरांचे अनेकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. अनेकांनी हे क्षण शुटिंग करत मोबाइलच्या कॅमेरात टिपले.

बारसगाव येथील वऱ्हाडी एमशेट वाडी येथे निघाले असता यामध्ये जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे पं.स.अर्धापूर उपसभापती अशोक कपाटे,शिवाजीराव बारसे. सरपंच मनीषा गजानन खंडागळे,उपसरपंच सरिता बालाजी गोदरे, शिवराज बारसे,मुंजाजी दळवे,बाबाराव बारसे,बाबूराव भोसीकर,रामराव भालेराव, शिक्षक रंगराव बारसे,बालाजी मठपती,गजानन देशपांडे,अमोल बारसे,एकनाथ मेगरकर,बालाजी गोदरे,

आदींनी बैल गाडीचा कासरा हातात धरला. उमाकांत बारसे यांचा २०१९ मध्ये विवाह झाला,सोनाजी बारसे यांचा २०२० मध्ये विवाह झाला आणि आता तिसऱ्या मुलाचा ही विवाह हुंडा न घेता संपन्न झाला असून हुंडा घेण्याच्या पद्धतीला या कुटुंबीयांनी मोडीत काढले असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्या’ कक्ष अधिका-याला कारणे दाखवा नोटीस

News Desk

बाबा या वयात मी फिरतोय तु किमान घराबाहेर पड, असं शरद पवारांना म्हणायंचं असेल – चंद्रकांत पाटील

News Desk

मी रिलायन्सनचं टेंडर रिजेक्ट केलं अन्…; गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

Aprna