HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राम शिंदेंचा पवारांवर निशाणा

मुंबई | जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून पेटलेले राजकारण आता अधिकच वाढत चालले आहे. पुतळ्याच्या अनावरणाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावरुन भाजपचे नेते राम शिंदे यांनी निशाणा साधला आहे.

जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांनी नातवाच्या प्रेमापोटी एक वक्तव्य केले. अहिल्‍यादेवींचा राष्ट्रवादीचे आमदार जन्म रोहित पवार यांच्या मतदारसंघात झाला आहे, असं सांगून, नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून झाला असल्याची टीका राम शिंदे यांनी केली आहे.

शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असे मला वाटते. परंतु अहिल्यादेवींचा असा नामोल्लेख करणे ही गंभीर चूक असून हा अवमान आहे,’ असल्याची टीका राम शिंदे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रताप सरनाईकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा,किरीट सौमय्यांसह भाजप नेत्यांचं ठिय्या आंदोलन !

News Desk

अन्यायाविरोधात ज्यांनी आवाज उठवला त्यांची कॉलर धरणे म्हणजे लोकशाहीवरचा सामुहिक बलात्कार

News Desk

मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर ! भातखळकरांची टीका

News Desk