HW News Marathi
महाराष्ट्र

‘क्या हुआ तेरा वादा’, शेतकऱ्यांची फडणवीसांना निवेदनातून आठवण

परभणी | पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतो, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच आश्वासनाची आठवण परभणीतल्या एका धनगर समाजातील शेतकऱ्याने त्यांना करून दिली आहे. फडणवीस दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने परभणी दौऱ्यावर होते. त्यावेळी शेतकऱ्याने निवेदनाद्वारे ‘क्या हुआ तेरा वादा’, असं म्हणत फडणवीसांना त्यांच्या आश्वासनाबद्दल विचारलं आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपण धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देतो म्हटले होते. आता ही आपलं केंद्रात सरकार असल्याने आपण धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी या वेळी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. काल ते परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी सोनपेठ ताल्युक्यातील विनायक कुलकर्णी यांच्या शेतात जाऊन कपाशीची पाहणी केली होती. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसंच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारशी भांडू, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. त्याचवेळी शेतकऱ्याच्या बाजूला उपस्थित असलेल्या काही लोकांपैकी एका व्यक्तीने फडणवीसांना एक निवेदन दिले. निवेदन उघडून पाहताच फडणवीस आवाक् झाले. त्या निवेदनावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, ‘क्या हुआ तेरा वादा….!’ त्यामुळे यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटीची मदत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

News Desk

लोकांना वाटतं की मी कोरोनाची लस घेतली आहे – शरद पवार

News Desk

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा गेम प्लॅन तयार

News Desk