HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-एसटीमध्ये जोरदार धडक

पंढरपूर | सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार आणि एसटी बसमध्ये आज (२ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमधील सर्वजण मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

इस्लामपूर-अक्कलकोट ही बस सोलापूरकडे निघाली असताना कारने समोरून येऊन जोरदार धडक दिल्यामूळे हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील मृतांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातात एक मुलगा जखमी असून त्याला उपचारासाठी पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यानी यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी-अतुल भातखळकर

News Desk

इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम राज्य सरकारचेच, पंकजा मुंडेंचा पुनरुच्चार

News Desk

नागपूर पदवीधर मतदार संघात अभिजीत वंजारींची दुसऱ्या फेरीत आघाडी कायम!

News Desk