HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे ऑन फिल्ड, नाशिकनंतर आता करणार पुणे दौरा

पुणे | राज्यात आता निवडूकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे सगळेच पक्ष आपल्या पक्षाला उभारी आणि बळकट करण्याचं काम करत आहेत. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सध्या राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. मात्र, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९ ते २१ जुलै असे तीन दिवस पुणे दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात आजीमाजी पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमा अंतर्गत राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत. अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बाबू वागसकर म्हणाले की, पुणे शहराच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर राज ठाकरे येत असून राज संवाद उपक्रमा अंतर्गत, सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी २० जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार असून, १ ते ४ दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे.

दोन दिवसात शहरातील चारही भागात बैठका राज ठाकरे घेणार आहेत. त्या दरम्यान प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेणार असल्याने, पुढील निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे जात आहे. तर दौऱ्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी करोना काळात ज्या संस्थांनी चांगले काम केले आहे. त्यांच्याशी विशेष संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अमित ठाकरेंकडे नवी जबाबदारी देणार?

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेत मोठी उलथापलथ होण्याचे संकेत मिळत आहेत. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा थेट अमित ठाकरेंकडेच जाणार असून त्याबाबतची आजच घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य शिरोडकर यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. शिरोडकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आता मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद अमित ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण, महापालिकेचा मोठा निर्णय!

News Desk

“बात निकली है तो दुर तक जायेगी”, रोहिणी खडसेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा राम सातपुतेंनी घेतला समाचार

News Desk

पुणे महापालिकेचा पाणीकपातीचा निर्णय

Gauri Tilekar