HW News Marathi
महाराष्ट्र

“निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली” – बाळासाहेब थोरात

मुंबई। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी (19नोव्हेंबर) सकाळीच देशवासियांशी संवाद साधला आणि यावेळी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. याच मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू होते, आणि यात शेतकऱ्यांना आज सकाळी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा दिलासा दिलाय. कायद्याच्या ज्या तरतुदीवर शेतकऱ्यांचा आक्षेप होता, तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे तहकूब करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो, की आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. आम्ही दिव्यासारखे प्रकाशमान सत्य काही शेतकऱ्यांना समजवू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा याच निर्णयावर दुसरीकडे टीका आणि त्याबरोबरच हा शेतकऱ्यांचा लढ्याचा विजय विजय म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधत विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.

बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय आहे.या बरोबरच बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत पुढे म्हटलं की, शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रक्त गोठवनाऱ्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविले गेले.या अत्याचाराची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही. कितीही मोठ्या अहंकारी शासनाला जनता झुकावू शकते, हे पुन्हा सिद्ध झाले. असा टोला देखील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारला लगावलाय.

नक्की कोणाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

एसटीतील रोजंदारीवरील 2,296 कर्मचाऱ्यांना प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या तर भाजप ‘पीएम केअर फंडा’तून त्यांना आजन्म पगार देणार आहे काय? एसटीत 93 हजार कर्मचारी आहेत. 15 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. ही संख्या हळूहळू वाढत जाईल.काही कामगारांनी यादरम्यान मरणास अनेकांना आमंत्रण दिले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कामगार मृत्यूप्रकरणी राज्याच्या परिवहन मंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ”सरकार किती निष्पाप एस.टी. कर्मचाऱ्यांचे बळी घेणार?” असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी विचारला आहे. हाच ‘समान नियम किंवा कायदा’ मानायचे ठरवले तर दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्यात वर्षभरात पाचशेहून जास्त शेतकऱ्यांनी बलिदान केले. त्याबद्दल नक्की कोणाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हेसुद्धा आता जनतेला कळू द्या. असा खरमरीत सवाल वजा टीका शिवसेनेच्या सामना या अग्रलेखातून विरोधी पक्ष भाजपवर करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद वापरून आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करतायत !

News Desk

HW Exclusive : पाण्यासारखा आकार घ्यावा, हीच आईची शिकवण! – रोहित पाटील

Aprna

‘जाणता राजा आणि नेणता राजा यात निवड करायची आहे’, संजय मोनेंची मनसेवर केलेली ‘ती’ पोस्ट वायरल

News Desk