HW News Marathi
महाराष्ट्र

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली | चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली असून ६० लाख रुपये ठोठवण्यात आला आहे. लालू प्रसाद यादव यांना सीबीआय विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरविले होते. तर गेल्या तीन वर्षापासून लालू प्रसाद यादव हे तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या प्रकरणाचा २६ वर्षांनंतर हा निकाल लागणार आहे. या प्रकरणी न्यायालयाने २४ जणांची निर्दोष मुक्ता केली आहे. 

चारा घोटाळा प्रकरणी १७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील ५५ आरोपींचा मृत्यू झाला आणि ७ आरोपी हे आता साक्षीदार बनले आहेत. तसेच यातील २ आरोपींनी गुन्हा मान्य तर ६ आरोपी फरार आहे. या प्रकरणात एकूण ९९ आरोपींवर अद्याप निर्णय बाकी आहे. 

१९९६ साली बिहारमध्ये ९०० कोटींचा प्राण्यांचा चारा घोटाळा झाला होता. यानंतर २९ जून १९९७ मध्ये लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केले होते. या घोटाळ्या प्रकरणी १२ डिसेंबर १९९७ मध्ये लालू प्रसाद यादव यांना सुटका करण्यात आली यानंतर पुन्हा एकदा २०१२मध्ये सीबीआयकडून चारा घोटाळ्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यानंतर २०१३ साली त्यांना पुन्हा एकदा पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘शिवडी न्हावाशेवा सी लिंक’ची पाहणी

Aprna

यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू नाही | नागपूर खंडपीठ

News Desk

“पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय”, फडणवीसांचा पवारांवर निशाणा

News Desk