HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर ‘या’ कारणासाठी देवेंद्र फडणवीस आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | राज्य एकीकडे कोरोनाचा सामना करत असताना काहीच दिवसांपूर्वी राज्यावर एका नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले होते. ३ जून रोजी महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. या निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फरक रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना बसला. याच पार्श्वभूमीवर, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे २ दिवसीय कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर याच संदर्भात आज (१३ जून) संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये कोकणातील नुकसानग्रस्त भागातील परिस्थिती विषयी यावेळी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या या कोकण दौऱ्यावर देखील ठाकरे सरकारवर, तसेच सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर जोरदार निशाणा साधला होता. “राज्य सरकारने चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणवासीयांना अत्यंत तोकडी मदत दिलेली आहे. इतके दिवस उलटूनही सरकारकडून कोणालाही कोणतीही मदत मिळालेली नाही”, असा दावा देखील देवेंद्र फडणवीसांनी केला होता. देवेंद्र फडणवीस हे २ दिवसीय कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गावांची पाहणी करून तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याच पार्श्वभूमीवर, मिळालेल्या सर्व माहितीच्या आधारावर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघ पद्धतीवर नख लावण्याचं काम केलात तर खपवून घेतलं जाणार नाही भाजपचा इशारा!

News Desk

महाविकास आघाडी सरकारने १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेल्या कराराने औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार – महेश तपासे

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित

Aprna