HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेते नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्यामुळे उपचारासाठी कोल्हापुरात आणले

मुंबई | संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून त्यांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. यानंतर त्यांना कोल्हापूरमध्ये उपचारासाठी आणले. नितेश राणेंवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार होणार आहे. नितेश राणेंना शुक्रवारी (४ फेब्रुवारी) कणकवली दिवाणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनवाली आहे. 

दरम्यान, या सुनावणीत राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता नितेश राणेंचा जामीन अर्जासाठी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. याआधी नितेश राणेंना दोन दिवसाच्या पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत नितेश राणेंची पाच तास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीच्या भाग म्हणून पोलिसांनी गोव्यात घेऊन गेले होते. राकेश परब आणि नितेश राणे यांचीही समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली होती. 

नेमके काय आहे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. तसेच या प्रकरणातील एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान नितेश राणेंचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्याच जाहीर होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

‘अतुल भातखळकरांचा सरकारवर हल्ला! म्हणाले…..’

News Desk

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू

News Desk