HW News Marathi
महाराष्ट्र

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आर्थिक पाहणी अहवाल

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढील आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी आज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे. राज्याच्या उत्पन्नात १ लाख ५६ हजारांची तूट झाली आहे. कोरोना संसर्गाचा राज्याला मोठा फटका बसला आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला सादर केला जाणार आहे.

आर्थिक पाहणी अहवालामध्ये २०२०-२१ च्या पूर्वअनुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत उणे ८ टक्के वाढ तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेत उणे 8 टक्के वाढ अपेक्षित दाखवण्यात आली आहे. तर कृषी आणि संलग्न क्षेत्रात ११,७ टक्के वाढ अपेक्षित आहे. उद्योगात उणे ११.३ टक्के आणि सेवा क्षेत्रात उणे ९ टक्के वाढ दाखवण्यात आली आहे.

पहिल्या सुधारित अंदाजानुसार, २०१९-२० चे सांकेतिक स्थूल उत्पन्न २८,१८,५५५ कोटी इतके होते तर २०१८-१९ मध्ये हे उत्पन्न २५,१९,६२८ कोटी होते. २०१९-२० मध्ये वास्तविक स्थूल राज्य उत्त्पन्न २१,३४,०६५ कोटी होते तर २०१९-१९ मध्ये २०,३३,३१४ कोटी होते.

सन २०१९-२० मध्ये दरडोई राज्य उत्पन्न २,०२,१३० कोटी होते तर २०१८-१९ मध्ये १,८७,०१८ कोटी होते. वर्ष२०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ च्या सांकेतिक स्थळ राज्य उत्पन्नात १,५६,९२५ कोटी घट अपेक्षित आहे. २०२०-२१ चे दरडोई राज्य सरकारचे उत्पन्न १,८८,७८४ अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, महसुली जमा ३,४७,४५७ कोटी तर २०१९-२० सुधारित अंदाजानुसार ३,०९,८८१ कोटी आहे.

अर्थसंकल्पीय पाहणी अहवालाच्या अंदाजानुसार, २०२०-२१ नुसार कर महसूल आणि करेतर महसूल अनुक्रमे २,७३,१८१ कोटी आणि ७४,२७६ कोटी आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या दरम्यान प्रत्यक्ष महसुली जमा १,७६,४५० कोटी अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ५०.८% आहे.

अर्थसंकल्पीय अंदाज २०२०-२१ नुसार, राज्याचा महसुली खर्च ३,५६,९६८ कोटी असून २०१९-२० सुधारित अंदाजानुसार ३,४१,२२४ कोटी आहे. मोठ्या , मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांद्वारे २० जून २०१९ अखेर ५४.०४ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली आणि २०१९-२० प्रत्यक्ष सिचन क्षेत्र ४०.५२ लाख हेक्टर होते.

तर लघु सिंचन प्रकल्पाद्वारे ३० जून २०२० अखेर १९.२६ लाख हेक्टर सिचन क्षमता निर्माण करण्यात आली. २०१९-२० मध्ये ८.६३ लाख हेक्टर ४४.८% क्षमतेचा वापर झाला. वार्षिक कर्ज योजनेअंतर्गत २०२०-२१ मध्ये कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रासाठी वार्षिक लक्ष ९३ हजार ६२६ कोटी होता.

४० हजार ५१५ कोटी रुपये पीक कर्ज वाटप

२०२०-२१ मध्ये डिसेंबर अखेर वित्तीय संस्थेद्वारे ४० हजार ५१५ कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाले. २०१९-२० मध्ये ते २८ हजार ६०४ कोटी इतकं होतं. २०२०-२१ मध्ये सप्टेंबर अखेर ३० हजार १४ कोटी रुपये कृषी मुदत कर्ज वाटप करण्यात आलेतर २०१९-२० मध्ये ३४ हजार ४२७ कोटी होता.

पशुसंवर्धन क्षेत्रात ४.४ टक्के वाढ अपेक्षित असून वने आणि लाकूड तोडणी ५.७ % वाढ अपेक्षित आहे. तसंच मत्स व्यवसाय आणि मत्स शेती २.६ टक्के वाढ अपेक्षित आहे. वस्तू निर्माण उणे ११.८ टक्के, बांधकाम उणे १४.०६ टक्के त्याचा परिमाण उद्योग क्षेतात उणे ११.३ टक्के वाढ अपेक्षित आहे.

प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांनी २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांना एकूण १० हजार ८९८ कोटी कर्ज वितरित केले. जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेत पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाले. पीडित शेतकऱ्यांना कमाल २ हेक्टर क्षेत्रातीतील शेतपिकांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये फळ पिकांसाठी २५ हजार प्रति हेक्टर या दराने दोन हफ्तात चार हजार ३७४.४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.

राज्यातील परदेशी गुंतवणूक

एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२० थेट परदेशी गुंतवणूक ८,१८,५२२ कोटी झाली आहे. देशातील एकूण गुंतवणूक २७.७ टक्के आहे. २०२०-२१ मध्ये सप्टेंबरपर्यंत राज्यातील थेट परदेशी गुंतवणूक २७,१४३ कोटी होती. मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत जून २०२० मध्ये राज्यात १.१३ लाख कोटी गुंतवणूक आणि २.५० लाखांपेक्षा जास्त अपेक्षित असलेले रोजगार प्रस्तावित आहे. ३१ मार्च २०२० राज्यातील वीज निर्मितीची स्थापित क्षमता आणि २०१९-२० वीज निर्मिती देशात सर्वाधिक होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Corona Vaccination लहान मुलांच्या लसीकरणासाठी वर्ष लागणार!

News Desk

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा, पक्षाने स्थापन केली उच्चस्तरीय समिती

News Desk

पहिल्या पावसात पैनगंगेला दुथंडी

swarit