HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या… उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्या आजच्या भेटीमागचे खरे कारण

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी निवड झालेले कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांचा शपथविधी सोहळा आज (२८ एप्रिल) सायंकाळी मुंबईत राजभवनामध्ये पार पडणार आहे. या छोटेखानी समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांना शपथ देणार असून या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळली आहे.

उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी काल (२७ एप्रिल) निवृत्त होत आहेत. लॉकडाऊनमुळे विमान आणि रेल्वे वाहतूक बंद असल्याने कोलकाता ते मुंबई हे दोन हजार किलोमीटरचे अंतर दत्ता यांना कारने प्रवास करुन मुंबईत दाखल झाले आहेत.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा अल्पपरिचय

दीपांकर दत्ता हे कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिवंगत सलीलकुमार दत्ता यांचे ते चिरंजीव आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अमिताव रॉय यांचे मेहुणे आहेत. गेल्या १४ वर्षापासून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता कोलकाता उच्च न्यायालयात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाचे काम केले आहे. दत्ता यांनी १९८९ मध्ये एलएलबीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली. कोलकाता उच्च न्यायालयात त्यांनी अनेक वर्षे वकिली केली. दत्ता यांनी केंद्र व राज्य सरकारसाठीही काही वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले आहे. कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधी कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. २२ जून २००६ पासून ते कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून सेवेत आहेत.

 

https://www.youtube.com/watch?v=WTyk1puSB5M

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घडवलं सामाजिक बांधिलकीचं दर्शन

News Desk

अनिवासीय भारतीयांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घ्यावा !

News Desk

जरा लांबून बोल ना… अजित पवार मनसे नगरसेवकावर का भडकले?

News Desk