HW News Marathi
Covid-19

त्या कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळे इस्लामपुरला कोरोनाचा धोका,गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेचा मागणी !

आरती मोरे, सांगली | सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरमध्ये एकाचं कुटुंबातील तब्बल २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने संपुर्ण जिल्ह्यात चिंतेचं वातावरण आहे. इस्लामपुर शहर ३ दिवसांसाठी १००% लाॅकडाऊन करण्यात आले आहे. ज्या कुटुंबामुळे सांगली जिल्ह्यावर आणि विशेषकरून इस्लामपुरवर हे संकट आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

इस्लामपुर पोलिस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे.अशी मागणीशिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार बापू यांनी केली आहे . यावेळी शहरप्रमुख,नगरसेवक शकील सय्यद,नगरसेवक प्रदिप लोहार,कमलेश शहा,सुर्यकांत पाटील,संदीप पवार,राजेंद्र पाटील उपस्थित होते.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, इस्लामपूर शहरातील त्या कुटूंबावर समाज विघातक कृत्य व शहराच्या जीवितास बाधा निर्माण केले बद्दल गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे. या कुटुंबामुळे इस्लामपूर शहरातील जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाल असून या कुटूंबातील सदस्यांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन न करता निष्काळजीपणा दाखवला, समाजाच्या जीवाशी खेळ केला आहे. आज शहरातील गोरगरीब,मजूर,कष्टकरी लोकांना जीवनावश्यक वस्तू सुध्दा मिळेना झाल्या आहेत.शहराची बदनामी झाली.लोकांना जीव मुठीत धरून बसावे लागत आहे’

या तक्रारीनंतर आता पोलिसांकडून या कुटुंबावर कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दुकाने ४ नंतर उघडी ठेऊन वसुली सुरु’; मनसेचा गंभीर आरोप

News Desk

अमेरिकेतील भारतीयांना धक्का ! डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘H1- B’ संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

News Desk

चिंताजनक! दिवसभरात राज्यात ३९,५४४ नवे कोरोनाबाधित

News Desk