HW News Marathi
Covid-19

‘दुकाने ४ नंतर उघडी ठेऊन वसुली सुरु’; मनसेचा गंभीर आरोप

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने संध्याकाळी ४ पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय सरकार ने दिला होता. करोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याऐवजी मुंबई पोलिसांकडून दुकाने सुरु ठेऊ देण्यासाठी भ्रष्टाचार आणि हफ्ता वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. देशपांडे यांनी दादरमधील एक व्हिडीओ शेअर करत पोलीस कोणत्या दुकानांकडून वसुलीसाठी किती रक्कम घेतात याचं ‘रेट कार्ड’चं सांगितलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा विडिओ व्हायरल

मनसे हे कायमच सरकार विरुद्ध टीका करत असतं. सध्या मनसे द्वारा एक विडिओ व्हायरल होतोय. दादर पश्चिमेला रेल्वे स्टेशनबाहेरील भाजी मंडईजवळ असणाऱ्या नक्षत्र मॉलच्या गल्लीमधील दुकाने ही दुपारी चार वाजल्यानंतरही खुली असल्याचं दाखवणारा व्हिडीओ देशपांडे यांनी पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये दुपारी चार वाजल्यानंतरही अनेक छोटी, मोठी दुकाने सुरु असल्याचं व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती सांगत आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने दुपारी चारनंतर या गल्लीतून बाईकवरुन फेरफटका मारत येथील परिस्थिती कॅमेरात कैद केलीय. अनेक दुकाने ही अर्धी शटर उघडी ठेऊ सुरु असल्याचं तसेच काही दुकांनांबाहेर दुकानातील कर्मचारी उभे राहून सरकारी अधिकाऱ्यांच्या हलचालींवर नजर ठेवत असल्याचं दिसत आहे.

आधी वसुली बार मालकांकडून, आता वसुली व्यापाऱ्यांकडून

हा व्हिडीओ शेअर करताना संदीप देशपांडेंनी ट्विटरवर व्हिडीओला, “आधी वसुली बार मालकांकडून… आता वसुली व्यापाऱ्यांकडून,” अशी कॅप्शन दिली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “मुंबईमध्ये करोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरु,” असल्याचं म्हटलं आहे. संध्याकाळी चारनंतर दुकान सुरु ठेवण्यासाठी मोठ्या दुकानांकडून पाच हजार रुपये, मध्यम आकाराच्या दुकांनांकडून दोन हजार तर छोट्या दुकानांकडून एक हजार रुपये वसूल केले जातात असा आरोप देशपांडेंनी केलीय.

४ नंतरही दुकाने सुरूच

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये बाजारपेठा, दुकाने खुली ठेवण्यासाठी सायंकाळी ४ पर्यंतची मर्यादा घालण्यात आली. परंतु या निर्बंधांना बाजारपेठांमध्ये हरताळ फासला जात आहे. सायंकाळी ४ नंतर घरी परतणारा कर्मचारीवर्ग खरेदीसाठी येत असल्याने दुकानदार तासभराच्या दिरंगाईने दुकाने बंद करतात. साधारण सायंकाळी ६ च्या सुमारास सर्व दुकाने बंद होतात. पण त्याच वेळी रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांना उधाण येते.

दुकाने बंद झाल्याने जास्तीचा ग्राहकवर्ग मिळतो, घरी जाणारे लोक आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे या प्रकाराला अधिकच खतपाणी मिळते आहे. मुंबईतील बहुतांशी भागात हीच परिस्थती आहे. दादर स्थानकाबाहेरची अवस्था अत्यंत बिकट आहे. कबूतरखाना, आसपासच्या गल्ल्या आणि स्थानक परिसरात शेकडो फेरीवाले रात्री उशिरापर्यंत दुकाने मांडून बसलेले असतात. अनेकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडलेला असतो. फेरीवाल्यांचे पेव धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, परळ, चेंबूर, घाटकोपर, अंधेरी आणि अन्य मध्यमवर्गीय वस्त्यांनजिक पाहायला मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

मंत्री धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

News Desk

जाणून घ्या…राज्यात लॉकडाऊन वाढवल्यानंतर काय सुरू, तर काय बंद

News Desk