HW News Marathi
महाराष्ट्र

सीरमला लागलेल्या आगीवरुन राजकीय वर्तृळात वेगळीच चर्चा रंगली!

मुंबई | पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आज (२१ दानेवारी) दुपारी भीषण आग लागली. जवळपास २ तासांपासून ही आग धुमसत होती. सुदैवाने या इमारतीत कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचं काम चालत नव्हतं. कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीबाबत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली आहे. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न मुक्ता टिळक यांनी उपस्थित केला. मुक्ता टिळक यांच्या शंकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही हीच शंका व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांना सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत माहिती मिळाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मलाही मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. पण ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्याआधी भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबात घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

मुक्ता टिळक काय म्हणाल्या होत्या?

“दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे”, अशी माहिती भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिकची मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार- पालकमंत्री छगन भुजबळ

News Desk

अखेर ‘या’ कारणासाठी देवेंद्र फडणवीस आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

‘ढगफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही’, उद्धव ठाकरेंचं विधान

News Desk