HW News Marathi
Covid-19

अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी!

अमरावती | राज्यात कोरोनारूग्णांची संख्या ५०० च्या जवळ पोहोचली आहे,धोका वाढत चाललेला आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात आत्तापर्यंत कोरोनाचे ५६ बळी गेले आहेत. तर आज अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. अमरावती शहरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा 2 एप्रिलला मृत्यू झाला असून आज सकाळी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात झाला होता. त्याला न्युमोनिया झाल्याचे खासगी डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. या रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत होते, म्हणून डाॅक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र 2 एप्रिल रोजी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या व्यक्तीचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आज (4 एप्रिल) पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज १७ हजारांहून अधिक नव्हे कोरोनाबाधित तर २९२ मृत्यू 

News Desk

राज्यात कोरोनाचा आकडा २१५, तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याचं सरकारसमोर संकट !

Arati More

पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार का?, पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकीला सुरूवात

News Desk